Published On : Wed, Jun 29th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मेट्रो सुरक्षा रक्षकाने चोराला स्टेशनवर रंगेहाथ पकडले

Advertisement

या आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोर पकडला होता

नागपुर: लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन वर सायकल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रंगेहाथ पकडले. नागपूरच्या भीम नगर भागातील निवासी आरोपी धम्मदीप गेडामला मेट्रो सुरक्षा रक्षकाच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे काही दिवस पूर्वी मेट्रो स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरांचे टोळके पकडण्यात पोलिसांना मदत मिळाली होती.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस तपासादरम्यान समजले की आरोपीने या आधी दोन सायकली चोरल्या होत्या. जवळच असलेल्या राजीव नगर वसाहतीत त्याने दोन्हीही सायकल २०० रुपयाला विकल्या होत्या. मिळालेल्या पैश्याने तो दारू प्यायला आणि सायकल चोरी करण्याच्या उद्देशाने तो मेट्रो स्टेशन परिसरात आला. सायकलचे कुलूप उघडायचा प्रयत्न करत असताना तेथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक श्री संदीप वाढारे यांच्या तो नजरेत आला. आरोपी मास्टर किल्लीच्या मदतीने सायकल चे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करीत होता.

आरोपीच्या एकूणच वागणुकीमुळे श्री संदीप वाढारे यांना त्याचा संशय आला आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती आपले सुपरवायजर श्री प्रवीण बरसागडे यांना दीली. श्री बरसागडे आपले सहकारी श्री लोकेश सहारे यांच्यासह मेट्रो स्थानकाच्या पार्किंग ला आले आणि सायकलचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती स्थानीय एमआयडीसी पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी आरोपी धम्मदीप गेडामला आपल्या ताब्यात घेतले.

कसून चौकशी केल्या नंतर आरोपीने २ सायकल चोरल्याची बाब काबुल केली. राजीव नगर निवासी सुमित पटले और लोकमान्यनगर निवासी राम धोटे यांच्या मालकीच्या त्या दोन्हीही सायकली होत्या. दोन सायकल चोरल्या नंतर तिसरी चोरण्याच्या प्रयत्नात तो सापडला. एमआयडीसी पुलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

महत्वाचे म्हणजे या आधी मेट्रो स्टेशन परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दुचाकी वाहन चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसाना यश आले होते. त्या पाठोपाठ आज मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी एका चोराला पकडले आहे.

Advertisement
Advertisement