Published On : Tue, May 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

१ जून (उद्या) पासून रात्री १० वाजता पर्यंत मेट्रो सेवा

Advertisement

आता सकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत मेट्रो सेवा उपल्बध

नागपूर : नागरिकांची सातत्याने होणारी मागणी बघता तसेच शाळा, महाविद्यालय आणि इतर कोरोना कालावधीच्या पश्चात संस्था पूर्ववत झाल्याने शिक्षण किंवा इतर कामांकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत महा मेट्रो नागपूरने ऑरेंज लाईन (कस्तुरचंद पार्क स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि ऍक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) वर धावणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ केली आहे.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या वाढीव फेऱ्यां दिनांक १ जून (बुधवार) पासून ऑरेंज आणि ऍक्वा लाईन वर सुरु होणार असून या अंतर्गत प्रवासी सेवा सकाळी ६.३० वाजेपासून दोन्ही खापरी, कस्तुरचंद पार्क, सिताबर्डी इंटरचेंज, लोकमान्य नगर स्थानकांवरून सुरु होणार आहे. दिवसाची पहिली फेरी ६.३० वाजता असेल तसेच सुधारित वेळापत्रकानुसार या दोन्ही मार्गिकेवरील टर्मिनल स्टेशन येथून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री १० वाजता उपलब्ध असेल.

आठवड्यातील सर्व दिवशी, सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजे पर्यंत दर १५ मिनिटांनी तर त्यानंतर १० वाजेपर्यंत मेट्रो सेवा दर २० मिनिटांनी असेल. उल्लेखनीय आहे कि, गेल्या रविवार पासून (२९ मे पासून) महा मेट्रोने ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गांवरील मेट्रो सेवा दर रविवारी रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. रविवारच्या मेट्रो सेवेत काहीही बदल नसून आधी दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे मेट्रो सेवा सुरु असेल. या मार्गिकेवरील शाळा, महाविद्यालय तसेच इतर संस्थांमध्ये सकाळच्या पाळीत कार्यरत असलेल्या विद्यार्थी किंवा इतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनावर अतिशय योग्य प्रकारे नियंत्रण मिळाल्याने आता शैक्षणिक इतर व्यावसायिक संस्थांमधील कामकाज पूर्ववत झाले आहेत या पार्श्वभूमीवर आता शिक्षण आणि इतर कामाकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढते तसेच मिहान येथील आयटी कंपनी देखील पूर्वपदावर आल्या आहेत, या मुळे मेट्रो मार्गिकेच्या किवा निकटच्या परिसरात असलेल्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या किवा कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांची, कर्मचार्यांची सकाळी रात्री १० वाजता पर्यंत मेट्रो फेऱ्या सुरु ठेवण्याची मागणी होती. सध्या या मार्गावर शेवटची मेट्रो फेरी रात्री ९.३० वाजता असते.

वाढीव फेर्यांप्रमाणे नवीन वेळापत्रक १ जून पासून म्हणजे बुधवार पासून लागू होणार आहे. या वाढीव फेऱ्यांचा नागपूरकरांना नक्कीच फायदा होणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement