Published On : Thu, Aug 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना…; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Advertisement

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.राजकारणात एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन, अशी घणाघाती टीका ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर केली.

यावर आता मुंबई भाजपच्या ट्वीटर (एक्स) अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे यांचे भाषण दाखवण्यात आले असून यावर देवेंद्र फडणवीस यांच्या शायरीने उत्तर देण्यात आले आहे.

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई फसानो का रुख मोड़ चुका हूँ मैं ! असे उत्तर भाजपकडून देण्यात आले आहे.येत्या आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी जोरदार लढत होताना दिसणार आहे.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.