Published On : Sat, Jan 13th, 2018

यवतमाळात पार पडला समलैंगिक विवाह

Advertisement


यवतमाळ: शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाने (बुधवारी) विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबतच वैदिक पद्धतीने विवाह केला. हा मुलगा अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्याला आहे. यवतमाळात पहिल्यांदाच समलैंगिक विवाह झाल्याने, हा विवाह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

या विवाहाला मुलाच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने मोजकयाच नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. नवविवाहित जोडप्यातील दुसरा मुलगा इंडोनेशियाचा असून, तोदेखील अमेरिकेतच वास्तव्याला आहे. दोघेही एकाच कंपनीत नोकरीला असून, दोघांनाही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. काही दिवसांपासून ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय कुटुंबीयांना सांगितला. अमेरिका, चीनमधून ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता.

यवतमाळ येथील एका पुस्तक विक्रेत्याचा मुलगा अमेरिकेत नोकरीला आहे. त्याला तेथे मोठ्या पॅकेजची नोकरी आहे. घरात लग्नाची चर्चा सुरू असताना त्याने आपण समलैंगिक विवाह करणार असल्याने सांगितले. नाइजास्तव वडिलांनी लग्नास होकार दिला. परंतु आईने मात्र विरोध केला. त्यामुळे मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीच शहराच्या मध्यवस्तीतील एका हॉटेलात हा विवाह झाला. माध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोचू नयेत म्हणून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला परवानगी नाकारण्यात आली होती.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement