Published On : Fri, Jul 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ; बंडखोरीनंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर

Advertisement

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत अजित पवार यांनी शिंदे आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह ‘घड्याळ’ पक्षचिन्हावर आपला दावा ठोकला आहे. तसेच ३० जून रोजीच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झालो आहे, अशा स्वरूपाचे प्रयत्न अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले. यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वाद पेटला आहे. या राजकीय घडामोडी पाहता शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा अध्यक्ष कोण? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.

अजित पवारांची अध्यक्ष पदावर झालेल्या कथित नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “कुणी काय केलं ते मला माहीत नाही. पण एक गोष्ट पक्की आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष मीच आहे. दुसरं कुणी स्वत:च्या नावाने विधान केले असेल किंवा काही बोललं असेल तर ते तसं बोलू शकतात. याला काहीही महत्त्व नाही. यामध्ये काहीही तथ्य नाही.

आज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रीय स्तरावरील काही नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकमताने शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. या बैठकीत अजित पवारांसह ९ आमदारांना आणि दोन खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.