Published On : Tue, Aug 7th, 2018

महसुल दिनी नायब तहसिलदा प्रेमकुमार आडे यांचा सत्कार.

Advertisement

कन्हान : – पारशिवनी तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे हयानी वेकोलि कडुन थकीत साडेबारा करोड रूपये शासनाचा महसुल वसुल करून उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल तहसिलदार वरूण सहारे हयानी महसुल दिनी टेकाडी येथील महाराजस्व शिबीरात प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .

बुधवार दि.१ ऑगस्ट २०१८ ला महसुल दिनाचे औचित्य साधुन ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) येथे दोन दिवसीय महाराजस्व शिबीराचे उद्घाटन सरपंचा सौ सुनिता पुथ्वीराज मेश्राम यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी तहसिलदार मा. वरूणकुमार सहारे यांच्या हस्ते करण्यात आले .

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी पारशिवनी तहसिल अंतर्गत महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक तसेच सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्‍न सत्वर निकाली काढण्यासाठी सन २०१७-१८ शासन आपल्या दारी या धरतीवर महाराजस्व अभियानाचे आयोजन करून गावपातळीवर लोकांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य लोकांना १०० % लाभ देण्याचे उत्कृष्ट कामगिरी बजावणारे तसेच वेकोलि कामठी उपक्षेत्र व गोंडेगाव उपक्षेत्र खुल्या कोळशा खदान प्रशासना कडुन शासनाचा थकीत साडेबारा करोड रूपये महसुल वसुल करून शासनाकडे जमा करणारे नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे , संगांयो विभाग आर बी लुटे, तलाठी एन.पी.गिरडकर, एन.पी.क्षीरसागर हयाना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन तहसिलदार मा. वरूणकुमार सहारे हयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी सरपंचा – सौ सुनिता पुथ्वीराज मेश्राम , उपसरपंचा – मिनाक्षी सुरेंद्र बुधे, ग्रा. प. सदस्य- मंजु जंम्बे , माया मनघटे, सिंधु सातपैसे, सुरेखा कांबळे , मिना झोड, आशा राऊत, दुर्गा राजपुत, शाबीर सिद्दीकी , अरूण सुर्ययवंशी, दिनेश चिमोटे , विनोद इनवाते, त्रिभुवन सिंग सचिव – प्रविण कुभारे ग्रा.प. कर्मचारी व शाशकीय अधिकारी आणि कर्मचारी व गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.