Published On : Fri, Nov 29th, 2019

शहर बेघर निवाऱ्यास महिला बालकल्याण समितीची भेट

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी चालविण्यात येणाऱ्या बेघर निवारा केंद्राला मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात येतो. यामुळे शहरात फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवाऱ्याची चांगली सोय उपलब्ध होते. त्यांचं जगणं सुसह्य व्हावं हा त्यामागील उद्देश आहे. यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत नागपूर महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवित आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य यामाध्यमातून अविरत सुरू आहे.

नागपूर महानगर पालिका, समाज कल्याण विभाग मार्फत चालविण्यात येणाऱ्या हंसापुरी शहरी बेघर निवारा गांधीबाग आणि बुटी कन्या शाळा बर्डी येथे मनपाच्या महिला व बालकल्याण समितीने भेट दिली. समितीमार्फत रात्र निवारा केंद्राबाबत आढावा घेण्यात आला. बेघर निवारा केंद्रातील सर्व बेघर नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला तसेच निवारा केंद्रात बेघरांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सोयी सुविधांचे निरीक्षण करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, महिला बालकल्याण सभापती संगीता गिऱ्हे, आशीनगर झोनच्या सभापती विरंका भिवगडे, समिती सदस्या मंगला खेकरे, अभियान व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह सर्व निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते. यावेळी समितीच्या सदस्यांनी संबंधितांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. मनपातर्फे सामाजिक भावनेतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.