Published On : Mon, Sep 28th, 2020

स्मार्ट सिटीची सिटी लेव्हल ॲडव्हायझरी फोरमची सभा संपन्न

नागपूर : नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्यावतीने सिटी लेव्हल ॲडव्हायझरी फोरमच्या सभचे सोमवारी (२८ सप्टेंबर) ला मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील स्मार्ट सिटी कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.

शहराचे महापौर व स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाचे सदस्य श्री. संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, श्री. ‍गिरीश व्यास, माजी आमदार श्री. प्रकाश गजभिये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत डायगव्हाणे व सिटी एक्शन ग्रुपचे प्रमुख श्री.विवेक रानडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे यांनी सदस्यांसमोर स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यांनी सांगीतले की, स्मार्ट सिटीज मिशन केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये सुरु केले आहे. स्मार्ट सिटीचा उद्देश नागपूरला राहण्यायोग्य (लाईव्हली), प्रदुषण रहित, सुरक्षित, सस्टेनेबल व सुदृढ शहर बनविण्याचा आहे. पूर्व नागपूरच्या मागासलेल्या भागातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण कार्य प्रारंभ केले आहे. ऑक्टोंबर पासून स्मार्ट सिटी क्षेत्रामध्ये कार्यास गती येणार आहे. पैन सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर सेफ ॲड स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण शहरात ३६०० कॅमेरे लावण्यात आले आहे. याच्या मदतीने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आरोपी शोधण्यात मदत ‍मिळत आहे. केंद्र शासनाने “इंडीया सायकल्स फार चेंज चॅलेंज” उपक्रम सुरु केला आहे. नागपूरात सायकल चालविण्यायोग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती “डेडीकेटेड बायसिकल लेन” तयार करण्यात येणार आहे. नागपूरच्या सीताबर्डी बाजारपेठेला “व्हेइकल फ्री झोन” करण्यासाठीपण सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यांनी सांगीतले की नुकतेच स्मार्ट सिटीच्या रॅकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. नागपूरने आता २३ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

Advertisement

सभेत खासदार डॉ.विकास महात्मे यांनी बायसिकल लेनच्या संकल्पनेचे स्वागत केले ते म्हणाले की, निरोगी राहण्यासाठी सगळयांनी सायकल चालविली पाहिले.

आमदार श्री. कृष्णा खोपडे यांनी स्मार्ट सिटीच्या पूर्व नागपूरातील क्षेत्रात कामात गती आणण्याचे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी प्रकल्प बाधित नागरिकांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी केली जेणेकरुन त्यांच्या मनात प्रकल्पाबद्दल विश्वास निर्माण होईल आणि त्यांचे सहकार्य लाभेल. आमदार श्री. गिरीश व्यास यांनी नागपूरला “क्राइम फ्री सिटी” बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. त्यांनी सांगीतले की, स्मार्ट सिटी क्षेत्रामध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात यावे तसेच शाळा, कॉलेज, रुग्णालयांसाठी जागा आरक्षित करावी. माजी आमदार श्री. प्रकाश गजभिये यांनी नागपूर शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी ” एकात्मिक दृष्टीकोणाने” प्रयत्न करण्याचे सांगीतले. स्मार्ट सिटीला फक्त एक क्षेत्रामध्ये नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगीतले.

सभेचे आभार प्रदर्शन कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकुर यांनी केले. सभेत स्मार्ट सिटीचे अधिकारी श्री. राजेश दुफारे, डॉ. शील घुले, अधि. मनजीत नेवारे, राहुल पांडे इत्यादी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement