Published On : Mon, Aug 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

घर सोडलेल्या 190 मुलांची पालकांशी भेट

Advertisement

-लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

नागपूर रेल्वेस्थानक म्हणजे अद्भुत विश्व आहे. या विश्वात सारेच हरवून जातात. याच ठिकाणी समाजविघातक कृत्य करणारे संधीच्या शोधात असतात. घर सोडून निघालेले अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात. मुलांकडून भिक्षा मागितली जाते असे आजवर उघडकीस आले आहे. मात्र लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या पथकाने अशा मुलांना समाजविघातक कृत्याच्या हाती लागण्यापूर्वीच ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. वर्ष 2021 ते 2022 पर्यंत बालकल्याण समितीच्या माध्यमातून लोहमार्ग पोलिसांतर्फे एकूण 190 मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Gold Rate
22 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,51,700/-
Gold 22 KT ₹ 1,41,100 /-
Silver/Kg ₹ 3,08,600 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. यासाठी पालक वेळप्रसंगी रागावतात तर कधी मारतात सुद्धा. या कठोर वागण्यातही त्यांचे प्रेम दडलेले असते. परंतु, तो वयाचा दोष असल्याने मुलगा किंवा मुलगी पालकांचे प्रेम समजू शकत नाही. मुले घर सोडून निघून जातात. घराबाहेरचे जग वाटते तितके सरळ व सहज नसते. जवळ पैसे नाही, भुकेली मुले सैरभैर होतात. त्यावेळी आईची ममता आणि वडिलांच्या प्रेमाची किंमत कळते. अलिकडे पोलिसांसह प्रवासीही सतर्क आहेत. प्रवासादरम्यान एखादा अल्पवयीन मुलगा, मुलगी दिसली आणि संशयास्पद वाटल्यास पटकन टीसी, पोलिस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधतात. याशिवाय रेल्वे गाडीत आणि फलाटावरही पोलिस गस्तीवर असतात. अल्पवयीन मुले, संकटात सापडलेली महिला, नातेवाईकांपासून दुरावलेली महिला, मुलींची आस्थेने विचारपूस करून चाईल्ड लाईनच्या माध्यमातून मुलांना बालगृहात ठेवतात. यानंतर बालकल्याण समितीच्या माध्यमातून पालकांच्या स्वाधीन केले जाते. काही प्रकरणांत लोहमार्ग पोलिस मुलांना थेट पालकांना स्वाधीन करतात. वर्षभरात जवळपास 37 च्या वर मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडविण्यात लोहमार्ग पोलिसांचा मोलाचा वाटा आहे.

अपर पोलिस महासंचालकांचे आदेश
रेल्वेस्थानकाजवळ स्लम वसाहती असतात. झोपड्यांत राहणारी गरीब महिला, लहान मुली आणि मुले यांच्यावर रेल्वे परिसरात अन्याय अत्याचार झाल्यास तो कुठला आहे, याचा विचार न करता त्यांच्या तक्रारीला प्राधान्य द्या आणि प्राधान्याने तपास करा. तसेच घराबाहेर निघालेल्या अल्पवयीन मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करा, असे निर्देश अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनी दिले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement