Published On : Thu, Feb 18th, 2021

मालमत्ता कर वसुलीचा उद्दिष्ट पूर्ण करा

Advertisement

कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय यांचे निर्देश

नागपूर : नवे आर्थिक वर्ष लागण्यास अवघे ४० दिवस शिल्लक असून मालमत्ता कर वसुलीसंदर्भात प्रत्येक झोनला उद्दिष्ट निर्धारित करून देण्यात आलेले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे यादृष्टीने चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थात ३१ मार्चपूर्वी निर्धारित उद्दिष्टाच्या कमीत-कमी ८० टक्के मालमत्ता कर वसुली करा, असे निर्देश कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय यांच्यासह कर निर्धारक व कर संग्राहक दिनकर उमरेडकर, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, अशोक पाटील, विजय हुमने, गणेश राठोड, हरीश राउत, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, कर अधीक्षक गौतम पाटील, सहायक कर अधीक्षक पांडुरंग शिंदे व सर्व झोनचे सहायक कर अधीक्षक उपस्थित होते.

यावेळी कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी कर वसुलीसंदर्भात दहाही झोनच्या कार्याचा आढावा घेतला. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाद्वारे १५ डिसेंबर २०२० पासून ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली. यामध्ये १५ डिसेंबर २०२० ते २० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत मालमत्ता कर एकमुस्त भरल्यास शास्तीत ८० टक्के तर २१जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास शास्तीत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. कोव्हिडच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना सुविधा निर्माण व्हावी व मनपाचे उत्पन्नही वाढावे याउद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत ४८.५२ कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसुली झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

Advertisement

याशिवाय नियमित कर वसुली वाढविण्याची सुद्धा आवश्यकता आहे. शहराच्या विकास कामांकरिता नियमित मालमत्ता कर वसुली होणे अत्यावश्यक असून त्यादृष्टीने प्रत्येक झोन स्तरावर कार्यवाही होण्याची गरज आहे. झोन स्तरावर सक्तीने मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही करण्यात यावी. याशिवाय वसुलीदरम्यान मालमत्तांना नोटीस बजावणे, मालमत्तांचा लिलाव व विक्री अशा बाबी आवश्यक असल्यास त्या सुद्धा सक्तीने करण्यात यावे, असेही निर्देश यावेळी कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.