नागपूर : इंडिगो एअरलाइन्सच्या बंगळुरू-पाटणा विमानाचे शुक्रवारी सायंकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैद्यकीय आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात बसलेल्या एका प्रवाशाला अचानक झटका आल्याने विमानाचे येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या रुग्णावर नागपुरातील KIMS किंग्सवे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमानात प्रवास करत असताना, अंकित प्रशांतला अचानक झटका आला, त्याच्या शरीराला जोरदार हादरे जाणवू लागले. तसेच ते बेहोश होऊ लागले.
क्रूला याची माहिती दिल्यानंतर नागपूर एटीसीशी संपर्क साधून येथे उतरण्याची परवानगी मागितली गेली.
खाली उतरल्यानंतर प्रशांतला तात्काळ किम्स किंग्सवे हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आले. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या मित्राने तातडीने रुग्णालयाचे डीजीएम एजाज शमी यांना माहिती दिली.
KIMS किंग्सवे रुग्णालयातील आपत्कालीन मेडिसिनचे सल्लागार डॉ. रुपेश बोकाडे यांनी रुग्णाची तपासणी केली असता प्रशांतला दौरे येण्याचा आजार असल्याचेआढळले. इतर काही वैद्यकीय चाचण्यांनंतर, एमआरआय ब्रेन प्लेनसह पुढील चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रुग्णाला नियमित काळजी घेण्यासाठी न्यूरोफिजिशियनच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.