
नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधांची मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मंगळवारी (ता.५) सीताबर्डी येथील मोरभवन बस स्थानक येथे पहाणी केली. पाहणीदरम्यान प्रवाशांसाठी अधिक दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, अग्निशमन समिती सभापती श्रीमती रुपाली परशु ठाकूर, परिवहन समिती सदस्य श्री शैलेश पांडे आणि परिवहन विभागाच्या व्यवस्थापक डॉ मेघना वासनकर उपस्थित होत्या.
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बस स्थानकावरील स्मार्ट सार्वजनिक शौचालयची पाहणी केली, मनपाच्या स्लम विभागाद्वारे प्रवाशांसाठी स्मार्ट शौचालय तयार करण्यात आले असून, जवळच हिरकणी कक्ष देखील आहे. महपौर यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करीत शौचालयांची स्वच्छता राखण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना उत्तम व दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होईल.
महापौरांनी सांगितले की, प्रवाशांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी परिवहन विभागाची असून, मोरभवन येथे उभारलेल्या शेड मध्ये लवकरात लवकर विद्युत सेवा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी संबधित विभागाला दिले. याशिवाय हिरकणी कक्षात येणाऱ्या महिलांसाठी व लहाण मुलांसाठी वातानुकूलित (एसी) सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश दिले.
याप्रसंगी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री योगेश लुंगे, कार्यकारी अभियंता श्री नरेश सिंगमजोडे, उपअभियंता श्री. कन्हैया राठोड, ऑपरेशन मॅनेजर श्री. राजीव घाटोळे, श्रम अधिकारी श्री. पिंपुरडे, श्री. गजानन नागूलवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.








