Advertisement
नागपूर : महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी (२४ जून) रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय लालगंज खैरीपुरा ची पाहणी करुन पूर्नविकास करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
खैरीपुरा येथील वाचनालयाचे स्लॅब काही दिवसापूर्वी पडले होते. याबद्दल महापौरांना नागरिकांनी कळविले होते. तसेच मनपाच्या महासभेत सुध्दा हा मुद्दा निघाला होता. महापौरांनी वाचनालयाची पाहणी करुन पुर्नविकास करण्याचे आदेश दिले.
तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करण्याचे सूचित केले. यावेळी सतरंजीपूरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, माजी उपमहापौर दिपराज पार्डीकर व सतरंजीपूरा झोनचे अधिकारी उपस्थित होते.