Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिका अंतर्गत महिला व बाल कल्याण समिती, समाजकल्याण विभाग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत उमेद डॉट नागपूर वर्धिनी वस्तू विक्री केंद्राला मंगळवारी (ता. १६) महापौर नंदा जिचकार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक सुनील हिरणवार प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी वस्तू विक्री केंद्राला भेट दिल्यानंतर तेथील वस्तूंची पाहणी केली. बचत गटांच्या माध्यमांतून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम आहे असे म्हणत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे विनय त्रिकोलवार, नूतन मोरे हे उपस्थित होते.
Advertisement