Published On : Mon, May 15th, 2017

महापौरांनी केला ‘अपघातमुक्त नागपूर मॉडेल’चा शुभारंभ

Advertisement


नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘अपघातमुक्त नागपूर मॉडेल’चा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.

यानिमित्त बंड्ड सोनी ले-आउट ते आय.टी. पार्क मार्गावर जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक सर्वश्री प्रमोद तभाने, दिलीप दिवे, सोनाली कडू, जीवन सुरक्षा प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष राजू वाघ, अभियान प्रमुख नितीन महाजन, प्रदीप येळणे, रवींद्र देशपांडे, ल.ना. भोळे, मोना रामानी, अनुसया गुप्ता, शैलजा चहांदे, एक्सपर्ट फाउंडेशनचे शरद मोरे, सुशील मौर्य, आशीष अटलोये, निशांत बिला, प्रफ्फुल्ल मोरे, राजेन्द्र वानखेड़े, मदन आळशी यांच्यासह जीवन सुरक्षा प्रकल्पाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्घाटनानंतर महापौर नंदा जिचकार यांनी काही परिवारास भेट दिली. आई, वडील, मुलगे आदीशी त्यांनी संवाद साधला. वाहतूक नियम पाळा, अपघात टाळा, वाहतूक नियम पाळणे ही जीवनपद्धती बनवा, आपले वाहन रस्त्यावर बेशिस्तपणे न लावता पार्किंगमधेच लावा, वाहतुकीला अडचण ठरू नका आदिबाबत मार्गदर्शन केले.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


अपघातमुक्त नागपूर ही ना. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील संकल्पना अभिनव पद्धतीने प्रत्यक्षात उत्तरविण्याचा हा प्रयत्न उत्तम असल्याचे महापौर जिचकार यावेळी म्हणाल्या. ना. गडकरी आणि ना. फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजू वाघ आणि जीवन सुरक्षा प्रकल्पाच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. स्थानिक नागरिकांच्या सहभागबद्दल त्यांचेही आभार मानले.

‘अपघातमुक्त नागपूर’ मॉडेल अंतर्गत सुरू झालेल्या जनजागृती अभियानाला नागपूर महानगरपालिका यथोचित सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement