नागपूर : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांचे नाव भाजपच्या संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहे.
नागपूर टुडेने मायाताई इवनाते यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी याची पुष्टी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायाताई सध्या मुंबईत असून आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
मायाताई इवनाते या आदिवासी महिला नेत्या असून नागपूरच्या माजी महापौर राहिल्या आहेत. अलीकडेच झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
त्या यापूर्वी अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या (NCST) सदस्या म्हणूनही कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांना दिल्लीमध्ये राज्यमंत्री दर्जा प्राप्त होता.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना केली जाते. राज्यातून आदिवासी समाजातील महिला उमेदवार राज्यसभेत पाठवण्याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, मायाताई इवनाते मुंबईत दाखल झाल्याने आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने त्यांच्या नावाच्या चर्चेला आणखी वेग आला आहे.
छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate...
नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate...
अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड
बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग





