Published On : Fri, Dec 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कडबी चौकजवळील ‘बबल्स किड्स प्ले झोन’ला भीषण आग; सुमारे १.५ लाखांचे नुकसान

Advertisement

नागपूर : कडबी चौक परिसरातील ‘बबल्स किड्स प्ले झोन’ला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून, आगीत खेळण्यांचे साहित्य आणि इतर उपकरणे जळून खाक झाली आहेत. या आगीत सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या या प्ले झोनमध्ये अचानक आग भडकली. आगीचे लोळ पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन वाहनाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. वेळेत कारवाई केल्यामुळे आग शेजारील भागात पसरली नाही.

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेच्या वेळी प्ले झोन बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना जर कामकाजाच्या वेळेत घडली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी जरिपटका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, अग्निशमन विभागाने विशेषतः मुलांसाठी असलेल्या व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.