Published On : Wed, Aug 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

इतवारीतील परफ्युमच्या गोदामाला भीषण आग; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

Advertisement

itwari nagpur fire

नागपूर : इतवारीच्या खापरपुरा येथील व्यापारी वस्तीत असलेल्या अत्तराच्या गोदामाला लागलेल्या आगीत एका अल्पवयीन मुलीचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इतवारीतील खापरपुरा परिसरात प्रवीण बाखडे यांचे श्री रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. ते आपल्या कुटुंबासह दुकानाच्या वर राहतो. बुधवारी पहाटे संपूर्ण कुटुंब झोपेत असताना शॉर्टसर्किटमुळे गोदाम असलेल्या तळमजल्यावर आग लागली. आगीने लगेच संपूर्ण इमारतीला वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ दाखल होता पुढील तपास सुरू केला आहे.

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement