Published On : Fri, Oct 22nd, 2021

गडअहेरी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे शहीद दिन साजरा

Advertisement

– मान्यवरांनी संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले,जयघोषणी गडअहेरी दुमदुमली

अहेरी: – लगतच्या गडअहेरी येथे गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी वीर बाबुराव शेडमाके यांचे शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शिवसेनेचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, माजी नगरसेवक नारायण सिडाम, ज्येष्ठ नागरिक नर्सिमलू कुसराम, भारती इष्टाम, बिरजू गेडाम, श्यामराव कुसराम, प्रफुल्ल येरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय स्थानावरून रियाज शेख यांनी, वीर बाबुराव शेडमाके हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठून पेटले होते. आदिवासी समाजातील क्रांतिकारक थोर महात्म्यांनी देशासाठी किंबहुना आदिवासी समाजासाठी बलिदान व प्राणाची आहुती दिले असून अशा थोर क्रांतिकारक महापुरुषांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन करून आदिवासी समाजच या देशाचे मूळनिवासी असल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे म्हणत अस्सल गोंडी भाषेत रियाज शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

याचप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी, क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके शूरवीर, पराक्रमी, विद्रोही, क्रांतिकारक योद्धा होते. इंग्रज राजवटीच्या गुलामी व शोषणा विरोधात बालपणीच उठून पेटले. इंग्रजांना ‘सडो की पडो’ करून सोडले. जल, जंगल, जमिनीच्या अधिकारासाठी बंड पुकारून इंग्रज राजवटीला नमते केले.अर्थात आदिवासी समाजाच्या उन्नती व उत्थानासाठी वीर बाबुराव शेडमाके यांनी सर्वस्वी अर्पण केले असून त्यांची शिकवणूक प्रत्येकांनी आत्मसाद करून त्या दिशेने एकसंघटिपणे वाटचाल करावे असे म्हणत सुरेंद्र अलोने यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर महापुरुषांच्या ऐतिहासिक जीवनावर आणि विविध पैलूंवर प्रकाश टाकले.

तर याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या भारती इष्टाम यांनीसुद्धा मनोगत व विचार व्यक्त केले. तदनंतर ‘अमर रहे, अमर रहे वीर बाबुराव शेडमाके अमर रहे’ या जयघोषणी गडअहेरी दुमदुमली तसेच पारंपारिक व संस्कृतीनुसार आदिवासी रेला व अन्य नृत्य सादर करण्यात आले.

यावेळी महेश कुसराम, अनिल सडमेक, विश्वनाथ कुसराम, बाजीराव कुसराम, शंकर सिडाम, दिलीप गेडाम, संतोष गेडाम, महादेव सिडाम, लचु सिडाम, प्रवीण गेडाम, भीमराव मडावी, अरुण मडावी, सुरेश कुसराम, सुमन कुसराम, पेरमीला कुसराम, मिनाबाई सडमेक, नगना कुसराम, कालिमा कुसराम, माया कुसराम, सपना कुसराम, संकलाबाई कुसराम, सुशीला कुसराम, गौरुबाई मडावी, रविता गेडाम, किरण मडावी, वंदना गेडाम, नेहा कुसराम, माया आलम, शारदा सिडाम, रसिका कुसराम, सोनी कुसराम, सुमन कुसराम आदी व बहुसंख्यने आदिवासी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष इष्टाम यांनी केले तर सूत्रसंचालन पोर्णिमाताई इष्टाम यांनी आणि उपस्थितांचे आभार बिरजू गेडाम यांनी मानले.

– सतीश कुमार,गडचिरोली