Published On : Wed, Aug 8th, 2018

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून विनोद तावडे यांच्याकडून श्रद्धांजली

Advertisement

मुंबई: उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने येथील विमानतळावर आणण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी कमांडिंग ऑफिसर कर्नल मूर्ती उपस्थित होते. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव दिल्ली येथून विशेष विमानाने येथील विमानतळावर आज रात्री 8 च्या सुमारास आणण्यात आले. यावेळी लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शासनाच्या वतीने पालकमंत्री श्री.तावडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. यानंतर शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

लष्कराच्या वाहनातून त्यांचे पार्थिव मालाडकडे नेण्यात आले. उद्या गुरुवार, दि. 9 ऑगस्ट रोजी मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तेथील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.