
पालघर :मला महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये स्थानिक मराठी युवक मोठ्या प्रमाणात कार्यरत दिसावेत असं मनापासून वाटतं. मात्र अनेक युवक आपल्या कौशल्यवृद्धीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी गमवाव्या लागतात,” असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथील कार्यक्रमात केलं.
ते पुढे म्हणाले, “आपण अनेकदा परराज्यातून येणारे कामगार आपली नोकरी घेतात असं म्हणतो, पण आपणच जर नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात केलं नाही, तर त्या संधी इतरांकडे जातील. म्हणूनच मराठी युवकांनी आता कौशल्यविकासावर भर देऊन स्वतःला सक्षम बनवणं गरजेचं आहे.”
फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून अनेक कौशल्यविकास योजना राबविण्यात येत आहेत. युवकांनी या योजनांचा लाभ घेत रोजगारक्षम बनावं, असंही त्यांनी यावेळी आवाहन केलं.









