Published On : Thu, Feb 22nd, 2018

मराठी भाषा गौरव दिन विशेष : ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांची मुलाखत

Advertisement

मुंबई :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषामंत्री विनोद तावडे आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सायं. ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी व शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका धनश्री लेले यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत अधिकाधिक लोकांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे आवाहन, संगणकावर मराठीचा वापर वाढावा यासाठीचे प्रयत्न, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा तसेच मराठी भाषा ग्लोबल होण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, मराठी भाषा संवर्धनामध्ये बिगर शासकीय संस्थांचा सहभाग, विश्वकोशाचे अद्ययावतीकरण, ‘भिलार पुस्तकांचं गावं’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती श्री. तावडे आणि श्री. गगराणी यांनी दिली आहे.