Published On : Thu, Nov 29th, 2018

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज एकमताने मंजूर करून मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय ईच्छाशक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली असून तत्परतेने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देताना एससी एसटी ओबीसिंच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याबद्दल ना आठवलेंनी समाधान व्यक्त केले आहे.
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी रिपब्लिकन पक्षाने सर्वप्रथम पाठिंबा दिला होता.दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आंबेडकरी जनतेची भूमिका रिपब्लिकन पक्षाने मांडली होती याची आठवण ना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाजाने अनेक मोर्चे आणि अनेक मराठा तरुणांनी आत्मबलिदान केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला आलेले यश साजरे करताना त्यासाठी शाहिद झालेल्यांना मराठा तरुणांचे संस्मरण कायम मनात ठेवा अशी भावना ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.