Published On : Sat, Jan 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मराठा लान्सर्सची विजयी सुरुवात खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा

Advertisement

नागपूर. मराठा लान्सर्स काटोल आणि खामला संघाने प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धक्का देत सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे सुरु असेलेल्या स्पर्धेत शनिवारी (ता. 13) महिला गटात मराठा लान्सर्स काटोल संघाने वायुसेना नगर संघाविरुद्ध हाफ टाइम मध्ये 16-12 अशी आघाडी घेतली व 23-12 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुरुषांच्या स्पर्धेत मराठा लान्सर्स खामला संघाने जय बजरंग क्रीडा मंडळ डेगमा संघावर 36-16 अशा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय नोंदविला. मराठा लान्सर्स काटोल संघाने ओम अमर युवा पार्क नागपूर संघाला 50-13 ने मात दिली.

निकाल
महिला
1. गजानन क्रीडा मंडळ नागपूर मात साई राम क्रीडा मंडळ रामटेक 41-17 (24-7 हाफ टाइम)
विजेत्या संघाकडून मंगला ढवळे चे उत्कृष्ट प्रदर्शन

2. विद्यार्थी क्रीडा मंडळ रघुजी नगर मात समर्थ क्रीडा मंडळ नागपूर 33-23 (17-7) (साक्षी राखडेचे विजेत्या संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन)

3. गडचिरोली मात गजानन क्रीडा मंडळ हुडकेश्वर 22-14 (14-7)

4. मराठा लान्सर्स काटोल मात वायुसेना नगर नागपूर 23-12 (16-12)

5. त्रिरत्न कामठी मात विद्युत क्रीडा मंडळ मोहाडी 25-16 (6-13)

6. रेणुका क्रीडा मंडळ अजनी मात शिवछत्रपती क्रीडा मंडळ हिंगणघाट 31-23 (13-9)

पुरुष
1. मराठा लान्सर्स खामला मात जय बजरंग डेगमा हिंगणा 36-16 (22-4)

2. सुभाष क्रीडा मंडळ हिंगणघाट मात जय बजरंग काटोल 36-13 (15-14)

3. एकलव्य सावनेर मात संमती क्रीडा मंडळ नागपूर 30-10

4. मराठा लान्सर्स काटोल मात ओम अमर युवा पार्क नागपूर 50-13

5. भीमा देवी क्रीडा मंडळ भिवापूर मात गर्जना क्रीडा मंडळ वर्धा 31-30 (18-17)

6. साई राम रामटेक बरोबरी (drew) हनुमान क्रीडा मंडळ काटोल 31-31 (13-11)

Advertisement
Advertisement