Published On : Wed, Aug 9th, 2017

फोटो पहा : मुंबापुरीत ‘एक मराठा, लाख मराठा’चा एल्गार

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक अशा मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे. अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे. भायखळा येथील राणीबागेहून मोर्चाला सुरुवात झाली असून पुढे हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.

मोर्चेकरांच्या मागण्यांबाबत सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून आलेला निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसमोर मांडला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

फोटो पहा