Published On : Wed, Jan 26th, 2022

मनपात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (२५ जानेवारी) ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्देश दिले होते. नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोन कार्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम मनपाच्या मुख्य इमारतीत डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात (स्थायी समिती सभागृहात) आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात महापौर श्री. दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी, सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे, माजी स्थायी समिती सभापती श्री. वीरेंद्र कुकरेजा प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सर्व नगरसेवक, मनपाचे प्रमुख अधिकारी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने जुडले होते. यामध्ये उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांचा समावेश होता. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.

Advertisement
Advertisement

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० करण्यात आली होती. हा स्थापना दिवस २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदारांना विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.

प्रारंभी महापौर दयाशंकर तिवारी यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा सर्व उपस्थित मान्यवरांना दिली. सर्वांनी या प्रतिज्ञाचे वाचन केले. सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी राष्ट्रीय मतदार दिवस बद्दल माहिती दिली. यावेळी उपायुक्त निर्भय जैन, निगम सचिव विजय हुमने, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्रीकांत देशपांडे, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर, उपअभियंता राजेश दुफारे, कमलेश चव्हाण, आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. झोन स्तरावर मतदार जनजागृती रैली काढण्यात आली. नागरिकांनी रैलीला चांगला प्रतिसाद दिला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement