Published On : Wed, Sep 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

माळेगाव नगरपंचायत जिंका पाच कोटी मिळवा; चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑफर.

Advertisement

बारामती : माळेगाव बुद्रूक नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग लवकरच जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. तसेच लोकसंस्थेच्या दृष्टीने माळेगाव हे मोठे गाव आहे.

त्याचपार्श्वभूमीवर माळेगावात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंगळवार (६ सप्टेंबर) रोजी बुथ कमिटीतील कार्य़कर्त्यांची विशेष बैठक घेतली होती.

यावेळी संवाद साधताना ते म्हणाले की, “बारामतीत माळेगाव नगरपंचायत ही भाजपच्या झेंड्याखाली आणण्यासाठी येथील नेतेमंडळींसह कार्य़कर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे. ज्या दिवशी ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात येईल, त्याच दिवशी राज्याच्या तिजोरीतून पाच कोटींचा विकासनिधी माळेगावला दिला जाईल.” असे आश्वासन त्यांनी दिले.

पंतप्रधान मोदींसारखे नेतृत्व देशात आता सर्वमान्य झाले आहे. त्यात आता महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवणे खूपच सोपे झाले आहे.

Advertisement

भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या लोकहिताच्या योजना गावोगावी पोहचविण्यासाठी प्रत्येक कार्य़कर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तसेच पुढील काळात सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.