Published On : Mon, Jun 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील मे-जून हप्त्यावर मोठी अपडेट; ‘या’ दिवशी ३००० रुपये मिळण्याची शक्यता

Advertisement

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींना मे व जून २०२५ या दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा निधी थेट बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही योजना लागू झाल्यापासून प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने दिले जात आहेत. मात्र मे महिन्यात निधी न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाची अवस्था होती.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा ११ वा हप्ता आणि जून महिन्याचा १२ वा हप्ता एकत्रितपणे ३००० रुपयांच्या स्वरूपात जमा केला जाणार आहे. हप्ता देण्यात झालेला विलंब तांत्रिक कारणांमुळे असून, तो आता जूनच्या अखेरीस दिला जाण्याची शक्यता आहे.

अधिकृत घोषणा अद्याप नाही-
सद्यस्थितीत यासंबंधी सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, संबंधित खात्यांतील अधिकाऱ्यांकडून हे नियोजन सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Advertisement
Advertisement