Published On : Fri, Apr 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सावनेरमध्ये मोठा प्रकल्प; देशमुखांचा विश्वास—तरुणांना मिळणार रोजगार

Advertisement

नागपूर : राज्य सरकारने सावनेर येथे प्रस्तावित ‘डिफेन्स-न्यूक्लियर एरोस्पेस कॉरिडॉर’साठी जमीन अधिग्रहणाला मंजुरी दिल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत करत आमदार आशीष देशमुख यांनी याला ऐतिहासिक निर्णय असे संबोधले आहे.

या प्रकल्पामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला बळ मिळणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या कॉरिडॉरमुळे विदर्भातील लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,100 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,45,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत देत प्रशासन पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. सावनेर परिसर औद्योगिक नकाशावर ठळकपणे समोर येईल आणि विदर्भाच्या आर्थिक प्रगतीला नवी चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement