Published On : Fri, Apr 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एलएसडी ड्रग्सची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, तिसरा फरार

Advertisement


नागपूर- शहरात नशाविरोधी मोहिमेदरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. क्राइम ब्रांच आणि अँटी नार्कोटिक्स पथकाने संयुक्त कारवाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावर दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या एलएसडी (LSD) ड्रग्सची खेप जप्त केली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत MIDC पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन आणि गस्तीदरम्यान जयताळा येथील बाडगे लेआउट परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्या. पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या जवळून १७ एलएसडी डॉट्स जप्त करण्यात आले. या ड्रग्सची किंमत अंदाजे १ लाख ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी कुणाल गिरी आणि दीपेश बोहरे हे गोंदिया येथील रहिवासी असून नागपूरच्या MIDC परिसरात भाड्याने राहत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल, एक मोपेड आणि एक पल्सर मोटारसायकल असा एकूण ४ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Gold Rate
Apr 24 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,41,300 /-
Silver/Kg ₹ 2,44,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अनुभव’ नावाचा तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस उपायुक्त राहुल माखनीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएसडीसारखे ड्रग्स तरुणांमध्ये झपाट्याने पसरत असून पोलिसांकडून याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. तसेच ही ड्रग्सची खेप नागपुरात कुठून आली आणि यामागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

एलएसडी (Lysergic Acid Diethylamide) हे अत्यंत प्रभावी सायकेडेलिक ड्रग असून ते मेंदूतील सेरोटोनिन रिसेप्टर्सवर परिणाम करते. यामुळे भ्रम (हॅल्युसिनेशन) निर्माण होण्याची शक्यता असते.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नशाविरोधी मोहिमेत सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement