Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हॉकी मैदानावर हॉकीचे जादूगार म्हणून ख्याति प्राप्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त मा.उपायुक्त रविन्द्र भेलावे यांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या म्यूरलवर माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगी आयोजित क्रीडा हॉकी स्पर्धेस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, माजी नगरसेवक किशोर जिचकार व सर्व वरिष्ठ हॉकी खेळाडू उपस्थित होते.