Published On : Sat, Apr 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

ऑपरेशन ‘थंडर’अंतर्गत मोठी कारवाई; पाचपावली पोलिसांकडून एमडी ड्रग्ससह युवकाला अटक

Advertisement

नागपूर :शहरातील अमली पदार्थविरोधी मोहिमेला गती देत पाचपावली पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई करत एमडी ड्रग्ससह एका 23 वर्षीय युवकाला अटक केली आहे. विक्रीच्या उद्देशाने हे ड्रग्स बाळगल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5.50 ते 7 वाजण्याच्या सुमारास कमाल चौक, शनिवार मार्केट परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान एमएच-49-सीजी-3946 क्रमांकाच्या होंडा अ‍ॅक्टिव्हा वाहनावरून येणाऱ्या नितेश संजय हेडाऊ (वय 23, रा. म्हाडा क्वार्टर्स, कपिलनगर) याला ताब्यात घेण्यात आले.

एमडी पावडर, मोबाईल आणि वाहन जप्त
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपीकडून 10.50 ग्रॅम एमडी पावडर (किंमत अंदाजे 73,500 रुपये) जिप-लॉक पाउचमध्ये आढळून आली. याशिवाय एक मोबाईल फोन आणि दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले असून, एकूण जप्त मालाची किंमत सुमारे 1,45,500 रुपये आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुरवठादाराचा शोध सुरू-
चौकशीदरम्यान आरोपीने हे ड्रग्स कपिलनगर येथील जगदीश गोखले (वय 25) याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर पोलिसांनी मोठा आघात केला असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges