Published On : Tue, Apr 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह दोन तस्कर जेरबंद

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत जोरदार मोहीम सुरू केली असून, पाचपावली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ससह दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी सापळा रचला. वैशाली नगर परिसरातील आंबेडकर गार्डन, कलकत्ता रेल्वे लाईनजवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींची ओळख शेख आदिल शेख रशीद आणि आशीष रामटेके अशी पटली. त्यांच्या अंगझडतीदरम्यान दोन झिपलॉक पाउचमध्ये एकूण १२.४९ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. जप्त केलेल्या ड्रग्सची अंदाजे किंमत ९४ हजार ७२० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींना एमडी ड्रग्सचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा मागोवा घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. शहरात अमली पदार्थांच्या जाळ्याचा विस्तार रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.