नागपूर: जिल्ह्यातील कन्हान पोलिसांनी वाळू तस्करांवर मोठी कारवाई करत वाळूने भरलेल्या ट्रकसह ४० लाखांहून अधिक रुपयांचा माल जप्त केला आहे.
माहितीनुसार, कन्हान पोलिसांना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात गस्तीदरम्यान वाळूने भरलेला टिप्पर मनसरकडून कन्हानच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी हालचाली सुरु केल्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाळूने भरलेल्या ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ट्रक चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करून ट्रकसह 10 ब्रास रॉड व 40 लाख 60 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
सध्या कन्हान नदीतून मोठ्या प्रमाणात मोटारसायकलवरून वाळूची तस्करी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...








