आगामी निवडणुकांच्या लोकसभा पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या सह एकुण १४ घटक पक्ष पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाचे लक्ष साकार करण्याकरता महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज वंसतराव देशपांडे सभागृह येथे संपन्न झाला.
यामध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व यांच्या सह एकुण १४ घटक पक्ष सहभागी होते. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व भारताच्या विकासासाठी मित्रपक्षांची एकजूटीची ताकद व संघटन अति महत्त्वाचे आहे. मोदी सरकारचे विकास कार्य घरोघरी पोहोचवून व एकजूट होऊन विकासाचे लक्ष गाठण्याकरिता संकल्प करण्यात आला. सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांनी मेळ्याकरीता उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून संबोधित केले.
मेळाव्याला प्रामुख्याने वक्त्या म्हणुन भाजपा महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. कृपालजी तुमाने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्रजी जैन, पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, भाजपाकडुन विदर्भ विभागीय संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, मेळाव्याचे संयोजक आ. प्रविण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. आशिष जयस्वाल, आ. टेकचंद सावरकर, माजी खासदार विकास माहात्मे, माजी आ. अनिल सोले, माजी आ. आशिष देशमुख, माजी आ. मल्लीकार्जुन रेड्डी, माजी आ. सुधीर पारवे, माजी आ. मिलिंद माने, माजी आ. गिरिष व्यास, किरण पांडव, प्रा. संजय भेंडे, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष बंन्टी कुकडे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संदिप इकटेलवार, सुरज गोजे, मंगेश काशीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, शहर अध्यक्ष प्रशांत पवार, अनिल अहिरकर, श्रीकांत शिवणकर, इश्वर बाळबुधे, कैलाश बोंबले, नरेंद्र डोंगरे, विनोद थुल, शुभम नवले, अमोल गुजर, संदिप कांबळे, रमेश कारेमोरे, अशोक मानकर, विशाल खांडेकर, शिवसंग्राम पार्टीतर्फे दिपक मते उपस्थित होते.
या मेळाव्याचे मेळाव्याचे संयोजक आ. प्रविण दटके हे होते. मेळाव्याचे सुत्रसंचलन संदिप गवई यांनी केले व आभार प्रदर्शन अश्विनी जिचकार यांनी केले. तसेच संयोजन राम आंबुलकर, विलास त्रिवेदी, विष्णु चांगदे यांनी केले.