नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना महायुतीची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरी आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार महायुती २१९, मविआ ५७, इतर १२ असा कल आहे.
यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आनंद साजरा करत आहेत.
‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकिन हैं, असे फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
एक है तो ‘सेफ’ है !
मोदी है तो मुमकिन हैं ! #Maharashtra #महाराष्ट्र— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024
नागपूर जिल्ह्यात भाजप आठ जागांवर आघाडीवर –
नागपूर जिल्ह्याबाबत बोलायचे झाल्यास भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस तीन जागांवर पुढे आहे. नागपूर शहराबाबत बोलायचे झाले तर भाजप चार जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर दिसत आहे. तर ग्रामीण जिल्ह्यातील सहा जागांपैकी भाजप चार, शिवसेना एका जागेवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.अत्यंत महत्त्वाच्या सावनेर जागेवर भाजपचे आशिष देशमुख आघाडीवर आहेत.