Published On : Mon, Apr 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महावितरण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा ‘नथिंग टू से ‘सर्वोत्कृष्ठ आणि ‘द फियर फॅक्टर’ व्दितीय

Advertisement

नागपूर, दि.8 एप्रिल 2024; महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत अमरावती येथे पार पडलेल्या दोन दिवसीय (5 व 6 एप्रिल) नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलाने सादर केलेल्या ‘ नथिंग टू से ’ या नाट्यप्रयोगाने सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह विविध वर्गवारीतील सहा प्रथम आणि एक व्दितीय पुरस्कार पटकावून बाजी मारली. तर चंद्रपूर परिमंडलाचे ‘ द फियर फॅक्टर ’ हे नाटक उपविजेते ठरले.

नागपुर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व नाट्य कलावंताना प्रोत्साहित करतांना सुहास रंगारी म्हणाले की, स्पर्धेनंतरही सर्व नाट्य कलावंतानी कायम एकमेकात संवाद ठेवावा. अपयश आले असले तरी, कलावंतानी थांबू नये, कायम प्रयत्न सुरू ठेवण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले. तर स्पर्धेचे अध्यक्ष आणि अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी म्हणाले की, जय-पराजय हा स्पर्धेचा एक भाग आहे, परंतू कलावंतांनी आपली कला सादर करण्यातून मिळवलेला स्वानंद आणि नाट्य रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे पारितोषिक आहे. नाटकाच्या प्रयोगातून आनंदासोबत अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या असल्याचे मत मुख्य अभियंता नागपूर परिमंडल दिलीप दोडके यांनी व्यक्त केले, तर नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात सर्व नाट्य कलावंतांनी सादर केलेली उत्कृष्ठ कला बघायला मिळाली असल्याचे मत मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडल सुनील देशपांडे यांनी सांगीतले आणि या स्पर्धेत पारितोषिक मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने प्रयत्न करावा असे आवाहन मुख्य अभियंता (प्र.) अकोला परिमंडल पवनकुमार कछोट यांनी केले.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर व्दारा निर्मित, प्रसाद दाणी लिखित आणि संजय पुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नथिंग टू से’ या नाटकांने नाट्यरसिकांच्या भावना अनावर केल्या. आईवडीलांचा घटस्फोट, कायद्याच्या कचाट्यामुळे बालपणातच बाबांपासून (माधव सहस्त्रबुध्दे) दुरावलेली मुलगी (मालविका) ही वयाच्या चोवीसाव्या वर्षी आपल्या बाबांना शोधत येते, तिच्या बालमनाला झालेल्या वेदना, वडीलांकडून बालपणात अपूर्ण राहीलेल्या अपेक्षा थेट नाट्य रसिकांच्या काळजाला हात घालतात, त्यात जीगर या रिक्षा ड्रायव्हरच्या भूमिकेने नाट्यरसिकांना कलेची एक वेगळी चमक दाखवली. प्रत्येकाच्या मनात भितीचा एक कोपरा दडलेला असतो, आपल्या हातून एखादा अपराध किंवा चूक घडली असली तर मनात भिती घर करते व आपल्याला सतत घाबरवित असते, अशा भीतीग्रस्त मुग्धाचे मानसिक द्वंद्व म्हणजे मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ सुनिल देशपांडे व्दारा निर्मित आणि अमेय दक्षिणदास यांनी लिहलेले, ‘द फियर फॅक्टर ‘ हे नाटक होते.

महावितरणच्या नागपुर परिक्षेत्राअंतर्गत पार पडलेल्या या स्पर्धेकरीता अकोला, अमरावती, नागपुर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील सर्व वरीष्ठ अधिकारी व नाटयरसिकांची मांदियाळी यवेळी उपस्थित होती या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देशमुख आणि प्रियंका सोळंके यांनी केले तर आभारप्रदर्शन स्पर्धेचे सचिव तथा उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

सर्वोत्तम नाटक

प्रथम :- ‘नथिंग टू से ‘ अकोला परिमंडळ

व्दितीय :- ‘ द फियर फॅक्टर’ चंद्रपूर परिमंडळ

दिग्दर्शन

प्रथम :- ‘नथिंग टू से ‘ अकोला परिमंडळ

व्दितीय :- ‘द फियर फॅक्टर’ चंद्रपूर परिमंडळ

अभिनय (पुरूष)

प्रथम :- ग्यानेश पानपाटील (‘नथिंग टू से ‘)

व्दितीय :- अभय अंजीकर (खरं सांगायच तर)

अभिनय (स्त्री)

प्रथम :- गौरी पुरकर, ‘नथिंग टू से ‘

दिव्तीय :- रोहिणी ठाकरे ‘द फियर फॅक्टर’

नेपथ्य

प्रथम :- राकेश बोरीवार ‘ द फियर फॅक्टर’

व्दितीय :- व्दितीय गोपाल पेचफुले ‘ नथिंग टू से’

प्रकाश योजना

प्रथम :- किशोर दाभेकर(नथिंग टू से’)

व्दितीय :- पवन शेडामे,मनिषा कोराने (‘द फियर फॅक्टर’)

पार्श्वसंगीत

प्रथम :- शुभम बारड (‘नथिंग टू से’)

व्दितीय :- विश्लेष लांजेवार, अमित बीरमवार (द फियर फॅक्टर)

रंगभूषा –वेशभूषा

प्रथम :- प्रमोद अंभोरे, निलेश मगर (नथिंग टू से)

व्दितीय :- कृतिका महल्ले, राजेश रामटेके (चक्रांत)

उत्तेजनार्थ पारीतोषिक

• आयशा :- स्नेहांजली पानसे (खरं सांगाच तर)

• रघूनाथ :- नावेद शेख (चक्रांत)

• जिग्या :- विजय गावात्रे नथिंग टू से)

• नंदन :- रेवत येसंबरे (द फियर फॅक्टर)

Advertisement
Advertisement