Published On : Thu, Apr 5th, 2018

उन्हाळा सुसह्य व्हावा यासाठी महावितरण लागली कामाला

Advertisement


नागपूर: एप्रिल महिन्याची नुकतीच सुरुवात झाली असली तरी नागपूरसह विदर्भात सर्वत्र उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला आहे, येत्या काही दिवसांत उनाचा तडाका अधिक वाढणार असल्याने येणारा उन्हाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत.

त्यातच अधून-मधून वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटना या काळात होत असल्याचे मागिल काही वर्षातील अनुभव असून तसा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणा-या बदलाचा प्रतिकुल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे येणारा ऊन्हाळा ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे.

महावितरणची बहुतांश विद्युत यंत्रणा उघडयावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात, या फ़ांद्या व वेली काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते, ही हानी टाळण्याकरिता नागपूर परिक्षेत्रातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची या दॄष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधितांची पुर्वपरवानगी घेऊन हया फांद्या झाटून घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो, यामुळे वीजपुरवठा खंडीत होतो. वीज वाहिन्यांत अडकलेले पतंग, मांजा, कपडयांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. याशिवाय ढिल्ले झालेले गार्डींग व स्पॅन टार्इट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्रातील रोहीत्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलीका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलण्यात येत आहे. वीजवितरण यंत्रणेत अर्थिंगचे महत्व अधिक आहे, याकरिता रोहीत्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात सुरू करण्यात येत आहे.

ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणतर्फ़े दर आठवड्यात स्टॅगरींग डे च्या दिवशी विविध वाहिन्यांवर देखबाल व दुरुस्तीची ही कामे करण्यात येत असतात, यावेळी ग्राहकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement