Published On : Thu, Sep 7th, 2017

बेरोजगार अभियंत्याना महावितरणनी दिली 2 कोटीची कामे

नागपूर: महावितरण कंपनीने विदुयत शाखेतील पदवीधर आणि पदविकाधारक बेरोजगार युवकांना लॉटरी पद्धतीनीं काम देऊन आज 2.2 कोटी रुपयांच्या कामाचे वाटप केले. नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयात आयोजित बेरोजगार युवकांच्या बैठकीत अधीक्षक अभियंता श्री नारायण आमझरे यांनी लॉटरी पद्धतीने या कामाचे वाटप केले. या बैठकीस ३० सुशिक्षित बेरोजगार अभियंता उपस्थतीत होते.

दोन वर्षांपूर्वी महावितरण कंपनी कडून राज्यातील पदवीधर आणि पदविकाधारक बेरोजगार युवकांना लॉटरी पद्धतीनीं काम देण्याचा निर्णय घेतला होता. यात निविदेशीवाय एकावेळी १० लाखाचे काम या युवकांना देता येते. एका आर्थिक वर्षात १० लाखाची ५ कामे या युवकांना करणे शक्य होणार आहे.

या बैठकीस कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे, स्वप्नील गोतमारे, सदामते उपस्थित होते. अतीरिक्त कार्यकारी अभियंता जयंत ठाकरे यांनी कामाच्या नोंदी पुस्तिकेत कश्या पद्धतीने केल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती दिली .