Advertisement
नागपूर : नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा रविवारी पार पडली. या सभेच्या माध्यमातून काँग्रेस , उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर सडकून टीका केली.
भाजपच्या बालेकिल्ल्यात झालेल्या विरोधकांच्या वज्रमूठ सभेला नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. वज्रमूठ सभा झाल्यानंतर मैदान बचाव कृती समितीच्या नागरिकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाची साफसफाई केली व मैदानात गोमूत्र शिंपडून मविआच्या नेत्यांचा निषेध केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आज सभेच्या ठिकाणी परिसरातील नागरिक व भाजपाचे माजी नगरसेवक हरीश डिकोडवार आणि अन्य माजी नगरसेवकांनी मैदानात गोमूत्र शिंपडले व साफसफाई करत आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.