नागपूर: सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६वी जयंती आज मंगळवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.
‘नासुप्र’चे सभापती तथा ‘नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्याहस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘नामप्राविप्र’चे अपर महानगर आयुक्त श्री. अविनाश कातडे, कार्यकारी अधिकारी श्री. अनिल कुमार पातोडे, कार्यकारी अभियंता श्री. अंभोरकर, कार्यकारी अभियंता श्री. ललित राऊत, आस्थापना अधिकारी श्री. विजय पाटील आणि शाखा अधिकारी श्री. बुरले, श्रीमती माया बागडे, श्री. पोतले तसेच ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे अन्य अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.