Published On : Fri, Oct 5th, 2018

खापरखेडा विज निर्मिती केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

खापरखेडा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील मेजर स्टोअर विभागाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता संस्कृती राहते मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर मान्यवरांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाला प्रवीण कहाळे, आर जी पराते, नागेश कोठारे, प्रकाश पाटील, पूजा चव्हाण, आम्रपाली मेश्राम, शुभांगी चिचारकर, सुरेंद्र डकरे, गोकुल आलम, रविन्द्र आत्राम, एस.डी.पाटील, धनश्री, खोराटे,सोनाली पुखाल, पत्रकार केशव पानतावणे आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.