Published On : Wed, Jan 31st, 2018

मेयो मधील महाराष्ट्र सुरक्षा बलाची युवक काँग्रेस ला केली धक्काबुक्की


नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे शिष्टमंडळ मेयो हॉस्पिटल च्या डीन ला निवेदन देण्यासाठी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांना मेयोत तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलानी धक्काबुक्की केली.

युवक काँग्रेस ने संयम दाखवत मेयोच्या डीन श्रीखंडे यांना झाला प्रकार सांगितला तेव्हा डीन यांनी महाराष्ट्र सुरक्षा बल च्या दोषी रक्षकांवर कारवाईचे संकेत दिले. तसेच एक निवेदन मेयो हॉस्पिटल मधील सायकल स्टँडबाबत नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात देण्यात आले व म्हणाले मेयो हॉस्पिटल सायकल स्टँड संचालक हा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड प्रमाणात अरेरावी करतो. एखाद्या रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाला ५-१० मिनटाचे काम किंवा औषध आणण्यासाठी जावे लागते तरी तो पुन्हा पुन्हा पैसे उकळतो सायकल स्टँड संचालकाची भाषा दादागिरी राहते त्यामुळे बिचारे नागरिक नरमतात एकदा तिकीट काढल्यावर कमीत कमी १२ तासासाठी ती वैध असायला पाहिजे रुग्णाच्या नातेवाईकांना बऱ्याच वेळा बाहेर औषधी आणायला जावे लागते कारण मेयो रुग्णालय शासकीय आहे तरी त्यांना वारंवार बाहेरूनच औषधी घ्यावी लागते त्यांच्या कडून पैसे उकळतो हे नियमबाह्य आहे.


नागपूर लोकसभा युवक काँग्रेस डीन नी सांगितले की सायकल स्टँड त्वरित हटवावा. सायकल स्टँड संचालकाच्या त्रासातून रुग्णांना मुक्त करावे.७ दिवसात सायकल स्टँड हटविला गेला नाही तर युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करेल अशी चेतावणी नगरसेवक बंटी शेळके यांनी दिली शिष्टमंडळात आकाश शुक्ला,जावेद शेख, मोईज खान, शोएब अश्रफी, काशीब खान, अब्दुल रशीद,राजेंद्र ठाकरे, अखिलेश राजन, अक्षय घाटोळे, वसीम शेख, राज बोकडे, प्रफुल्ल इजनकर, हेमंत कातुरे, सौरभ शेळके, पूजक मदने, आशिष लोणारकर, स्वप्निल बावनकर, फजलूर कुरेशी, निखिल बालखोटे,सागर चव्हाण, नितीन गुरव इत्यादी उपस्थित होते.