Published On : Sat, Jun 8th, 2019

SSC Result 2019 : फक्त २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

राज्यभरातून यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थी बसले होते.

दहावीच्या परीक्षेत राज्यातील केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत तर २५ हजार ९४१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

राज्यभरातून यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थी बसले होते. त्यातील १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत.

मागच्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी घसरला आहे. नवीन अभ्यासक्रम असल्याने कमी निकाल लागला असावा असा अंदाज शकुंतला काळे यांनी व्यक्त केला. २००७ साली राज्यात दहावीचा सर्वात कमी ७८ टक्के निकाल होता.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात दहावीच्या वर्षाला खूप महत्व असते. कारण पुढील शैक्षणिक प्रवास कुठल्या दिशेने होणार ते या निकालावर अवलंबून असते.