Published On : Mon, Jul 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराजस्व अभियानात 3,436 महिलांना शेतकरी दर्जा; नागपूर विभाग अव्वल

Advertisement

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यभर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील 3,436 महिलांची ‘महिला शेतकरी’ म्हणून नोंद करण्यात आली असून, त्यांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामध्ये नागपूर विभागाने 1,219 महिला शेतकरी प्रमाणपत्रांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

२२ जुलैपासून सुरू झालेल्या या अभियानात पहिल्या सहा दिवसांत 4,35,209 नागरिकांनी विविध महसुली सेवा आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला. हे अभियान 2 ऑगस्टपर्यंत राज्यभर सुरू राहणार आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलांना जमिनीवरील हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यात 1,067 महिलांची, गडचिरोलीमध्ये 75, भंडाऱ्यात 39 आणि चंद्रपूरमध्ये 38 महिलांची शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली.

अभियानादरम्यान महसूल विभागाकडून 15 प्रकारच्या महसुली सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये स्वामित्व सनद वितरण, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल लाभार्थी सहाय्य तसेच शासकीय जमिनीवरील जुन्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

Advertisement

‘जिवंत सातबारा’ मोहिमेत सातारा (2,733), बुलढाणा (1,460), अमरावती (660), नागपूर (652) आणि सांगली (543) येथे शेतकऱ्यांचे महसुली प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि वेगवान सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.” त्यांनी अभियानाला सहकार्य करणाऱ्या आमदार आणि लोकप्रतिनिधींचेही आभार मानले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.