Published On : Mon, Aug 27th, 2018

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

मुंबई: भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या मंत्रालयातील नूतनीकृत कार्यालय आणि ग्रंथालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले.

यावेळी संस्थेचे मानद अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मानद सचिव तथा महारेराचे सदस्य डॉ. विजय सतबीर सिंह तसेच संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंत्रालय इमारतीच्या नूतनीकरणादरम्यान हलविण्यात आलेले संस्थेचे कार्यालय आणि ग्रंथालय तळ मजल्यावर महाराष्ट्र बँक शाखेच्या शेजारी पुन्हा सुसज्ज स्वरुपात साकारण्यात आले आहे. ग्रंथालयाकडे लोकप्रशासन आणि अनुषंगिक विषयावर सुमारे बारा हजारांची ग्रंथसंपदा आहे. संस्थेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी संस्था स्थापनेचा उद्देश आणि वाटचालीसह विविध उपक्रम आणि ग्रंथालयाबाबत माहिती दिली.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण तसेच फित कापून कार्यालय आणि ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

भारतीय लोक प्रशासन संस्थेची स्थापना १९५४ मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आली. लोक प्रशासनाशी संबंधित अभ्यास, विचारमंथन आणि संशोधन करून प्रशासनास सहकार्य करण्यासाठी या अराजकीय स्वरुपाच्या संस्थेची निर्मिती झाली आहे.

Advertisement
आषाढ़ी एकादशी पर विद्यार्थियों की अनोखी वारी #AshadhiEkadashi #AshadhiEkadashi2026 #PandharpurWari

आषाढ़ी एकादशी पर विद्यार्थियों की अनोखी वारी #AshadhiEkadashi #AshadhiEkadashi2026 #PandharpurWari

दिल्ली लाठीचार्ज के विरोध में टॉर्च मार्च.. #nasik #maharashtranews #pradhanresign #students #bjp

दिल्ली लाठीचार्ज के विरोध में टॉर्च मार्च.. #nasik #maharashtranews #pradhanresign #students #bjp

नीट पेपर लीक पर कैंडल मार्च निकला #maharashtranews #navimumbai #maharashtra #vidarbhanews

नीट पेपर लीक पर कैंडल मार्च निकला #maharashtranews #navimumbai #maharashtra #vidarbhanews

मर्डर केस की मुख्य महिला आरोपी 4 साल से थी फरार #nagpurnews #Crime #MurderCase #POCSO #Arrest #news

मर्डर केस की मुख्य महिला आरोपी 4 साल से थी फरार #nagpurnews...

कुख्यात 'काल्या' हथियार समेत गिरफ्तार #nagpurnews #Crime #crimebranch #Kalya #Arrest #WeaponSeized

कुख्यात 'काल्या' हथियार समेत गिरफ्तार #nagpurnews #Crime #crimebranch #Kalya #Arrest #WeaponSeized

बस डिपो में लगी क्लास! #Buldhana #STBus #StudentProtest #MaharashtraNews #Education #ShivSenaUBT

बस डिपो में लगी क्लास! #Buldhana #STBus #StudentProtest #MaharashtraNews #Education #ShivSenaUBT

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges