Published On : Sat, Feb 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला ;उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका

Advertisement

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या हत्या करण्यात आली.मॉरिस नावाच्या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

राज्यातील कायदा- सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्यासाठी शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता. पण आता तोही तोकडा पडतो. या महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का? असा प्रश्न मला पडला आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

Today’s Rate
Thursday 03 Oct. 2024
Gold 24 KT 76,100 /-
Gold 22 KT 70,800 /-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान त्ताधारी पक्षांमधील दोन नेत्यांकडून आधी गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर आता दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

Advertisement