हिवाळी अधिवेशन: ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केले त्यांचे डल्लामार पुरावे; CM फडणवीस

Advertisement

नागपूर- ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला. दरम्यान, या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांना हात घातला. सर्व पिकांमध्ये वाढ आहे, कापूस गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 70.46 लाख होता, तो यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच 51.90 लाख क्विंटल आला असल्याचे त्यांनी सांगितले.

गोसीखुर्द 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

गोसीखुर्द प्रकल्पाबाबतची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यासाठी 18 हजार 500 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. पुढील 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अर्ज करता आला नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ

दरम्यान कर्जमाफीला पात्र होते, मात्र त्यांना अर्ज करता आला नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कर्जमाफीसाठी एकूण 77 लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी 69 लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतले. त्यातून जवळपास 41 लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.