नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज 29 ते 31 जानेवारी असे तीन दिवस दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी जाणार आहेत.
आज 29 रोजी डीसी चौक, सेक्टर 9 रोहिणी येथे त्यांची प्रचारसभा असेल, तर त्यानंतर पहाडगंज भागात मराठी प्रकोष्ठ बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. 30 आणि 31 जानेवारी रोजी सुद्धा त्यांच्या दिल्लीत सभा असतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीस आहेत.
5 फेब्रुवारी रोजी एकाच वेळी मतदान दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी एकाच वेळी मतदान होणार आहे. तीन दिवसांनी, म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी, दिल्लीवर कोणाची सत्ता स्थापन होणार हे कळणार आहे. नामांकन प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू होईल.
दिल्ली विधसनभा निवडणूक ही सर्वात कमी कालावधीची म्हणजेच 28 दिवसांची निवडणूक असेल. यावेळी दिल्लीत 1.55 कोटी मतदार मतदान करतील, त्यापैकी सुमारे 83 लाख पुरुष आणि 71 लाख महिला मतदार आहेत. यंदा जास्तीत जास्त 25.89 लाख तरुणही निवडणुकीत मतदान करणार आहेत.
अमरावती डबल मर्डर केस में बड़ा खुलासा! #AmravatiNews #MaharashtraNews #DoubleMurder #CrimeNews
वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस का धरना #MaharashtraNews #NCP #SonamWangchuk #NEET #PaperLeak
अमरावती में छात्रों का जोरदार प्रदर्शन #vidarbhanews #amravati #updatenews #maharashtranews
रील्स के चक्कर में मलंगगढ़ पर फंसे युवक #maharashtranews #ambarnath #updatenews #maharashtra
निरुपम का शिंदे नेतृत्व पर बड़ा दावा #NagpurNews #ShivSena #ubt #political #LatestNews...
भारी बारिश में छात्रों का वांगचुक समर्थन प्रदर्शन #maharashtranews #bhiwandi #updatednews #news





