मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यापाश्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला. महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून केंद्रातील नेतृत्वाला सुमारे ११५ जणांच्या नावांची यादी सादर केल्याची माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात एक बैठक होणार असून, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेमक्या किती जागा लढणार, यावरून लवकरच पडदा उठेल.
भाजप नेत्यांकडून विद्यमान आमदार, समर्थक अपक्ष आमदार यांच्या मतदारसंघातील आढावा घेण्यात आला आहे. यानंतर आता सुमारे १०० ते ११५ जणांच्या नावांची शिफारस राज्यातील भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
भाजपाची पहिली यादी आज किंवा उद्यापर्यंत येऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. दिल्लीत आज यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.